Wednesday, July 29, 2009

चालुपणा

***** आजची वात्रटिका *****
**********************
चालुपणा

पक्षातल्या कार्यकत्यांना
बरोबर खडे चारले जातात.
मतदारांच्या माथीही
आपलेच वारस मारले जातात.

लोकशाहीचे लेबल लावले की,
घराणेशाहीही आवडली जाते !
निवडून निवडून काय तर
दगडातुन वीटच निवडली जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...3april2025