Wednesday, July 15, 2009

समलैंगितेची मान्यता.

***** आजची वात्रटिका *****
**********************
समलैंगितेची मान्यता

प्रगतीचे लक्षण म्हणून
नको नको ते स्विकारायला लागलो.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली
निसर्गालाही नाकारायला लागलो.

अनैसर्गिक मार्ग शोधले की,
संकटाला समजून घ्यावे लागेल.
नवसमाजालाही शेवटी
नैसर्गिक मार्गानेच जावे लागेल.

निसर्गाचा अन्याय तर
आम्हांलाही मान्य आहे !
त्याचा विजयोत्सव बरा नाही
जे दु:ख व्यक्तिजन्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...