Tuesday, July 28, 2009

निळाईचे वर्तमान

***** आजची वात्रटिका *****
**********************

निळाईचे वर्तमान

दलित ऎक्याची वाट
केली बिकट बिकट
दिसामाशी निळाई
होई फिकट फिकट.

वेगळीच परडी,
वेगळाच जोगवा.
फिकट निळाईला
कधी खुणवी भगवा.

आयत्या शिकारीभोवती
गिधाडांचा गराडा गराडा !
भिमाईच्या स्वप्नांचा
रोज चुराडा चुराडा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 307 वा l पाने -57

आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 307 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1W9ND5N9la0-...