Monday, July 27, 2009

पक्षीय स्वच्छता अभियान

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षीय स्वच्छता अभियान

एका राजकीय पक्षाने
पक्ष स्वच्छ करायचे ठरविले
पक्षीय स्वच्छता अभियान
मोठ्या थाटामाटात मिरविले.

कोण मोठा ? कोण छोटा ?
असे काही काही पाहिले नव्हते !
पक्ष स्वच्छ झाला तेंव्हा
पक्षात कुणीच राहिले नव्हते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...3april2025