Friday, July 31, 2009

राजकीय अतिक्रमण

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय अतिक्रमण

गुंडा-पुंडांच्या झुंडीने
लोकशाही व्यापली आहे.
मतदानापुरतीच वाटते
लोकशाही आपली आहे.

गुंडा-पुंडांची झुंडशाही
चिंता करायला लावते आहे !
मोकळे रान दिसले की,
गुंडा-पुंडांच्या झुंडींचे फावते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 27 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 328 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 27 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 328 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1o0QLgAg...