Monday, August 26, 2019

गोपाळकाला

आजची वात्रटिका
-----------------------------------------
गोपाळकाला
हौश्या, नवश्या,गवश्यांनी,
जत्रा-यात्रा सजू लागल्या.
इकडच्या तोफा तिकडे गेल्याने,
सभावर सभा गाजू लागल्या.
तोफा धडाडू लागल्या,
पोपट मिठू मिठू बोलू लागले.
कालपर्यंत जिथे होते,
तिथलीच पोल खोलू लागले.
कुणी येतोय, कुणी जातोय,
कुणी आला,कुणी गेला आहे !
जत्रा-यात्रांतून सिद्ध झाले,
सगळाच 'गोपाळकाला' आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7048
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट2019
----------------------------------------

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...