Wednesday, August 14, 2019

वृक्षारोपण आढावा



आजची वात्रटिका
------------------------------------
वृक्षारोपण आढावा
वृक्षारोपणाच्या गोळाबेरजेनुसार,
आपले जंगल व्हायला हवे होते.
आपले भविष्यात काय होणार?
हे जणू झाडांना पक्के ठावे होते.
खड्डयात खड्डा, झाडावर झाड,
आकडे टार्गेटवार फुगवले जातात !
हल्ली जमिनीपेक्षा जास्त झाडे,
कागदावरच उगवले जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7038
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...