Saturday, August 17, 2019

शिक्षणाचा रतीब

आजची वात्रटिका
------------------------------------
शिक्षणाचा रतीब
शिक्षण नावाच्या गंगेला,
गटारगंगेचे रूप आले आहे.
वाघिणीचे दूध आता,
मांजरीचे दूध झाले आहे.
कुणी यांव यांव करतो आहे,
कुणी त्यांव त्यांव करतो आहे.
मांजरीचे दूध पिऊन,
कुणी म्यांव म्यांव करतो आहे.
गुरगुरणे राहिले बाजूला,
म्यांव म्यांवचीच ओढ आहे !
गोंडा घोळणाऱ्या मांजरींशीच,
बोका आज गोड आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5541
दैनिक पुण्यनगरी
17ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...