Thursday, August 8, 2019

खेळ मांडला...



आजची वात्रटिका
------------------------------------
खेळ मांडला...
कुणाच्या जत्रा आहेत,
कुणाच्या यात्रा आहेत.
सत्तेच्या प्राप्तीसाठी
भानगडी सतरा आहेत.
कुणाला सत्ता राखायची आहे,
कुणाला सत्ता मिळवायची आहे !
जत्रा आणि यात्रा भरवून,
जनता नव्याने खेळवायची आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5533
दैनिक पुण्यनगरी
8ऑगस्ट2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका7मे2024....वर्ष- तिसरे..अंक -335वा

 दैनिक वात्रटिका 7मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -335वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XE2_VvvCLoKKhYBib2xIqMbRp...