Thursday, August 1, 2019

पावित्र्याची व्याख्या

आजची वात्रटिका
----------------------------
पावित्र्याची व्याख्या
काल जे जे शत्रू होते,
ते ते अचानक मित्र झाले.
जे जे पदराखाली आले,
ते ते अचानक पवित्र झाले.
वेटींग लिस्ट वाढत असल्याच्या,
खबरा अगदी पक्क्या आहे !
पापालाही लाज वाटेल,
अश्या पावित्र्याच्या व्याख्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7025
दैनिक झुंजार नेता
1ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...