Friday, August 9, 2019

प्रादेशिक असमतोल

प्रादेशिक असमतोल
कुठे पावसामुळे ओरडा आहे,
कुठे पावसासाठी ओरडा आहे.
महाराष्ट्रात पावसाचे थैमान,
मराठवाडा मात्र कोरडा आहे.
प्रादेशिक असमतोल तर,
अगदी इथल्या ठायी ठायी आहे !
मराठवाड्याचे हे दुःख,
थोडे नाही,अगदी बारामाही आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7033
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट2019

No comments:

यशाचे मोजमाप