Wednesday, August 21, 2019

लेकुरे उदंड झाली

आजची वात्रटिका
------------------------------------
लेकुरे उदंड झाली
इकडून आणि तिकडून
लेकरांचीच झुंड आली.
राजकीय मंचावरती,
लेकुरे उदंड झाली.
लोकशाहीवर घराणेशाहीचे
राहून राहून हल्ले आहेत.
पोरं असोत वा पोरी,
सारी सूर्याचीच पिल्ले आहेत.
फादर झाले गॉडफादर,
परस्परांना टाळी आहे !
आपली लोकशाहीच,
सदासर्वदा लेकुरवाळी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7043
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
नमस्कार,
ज्यांना माझ्या
whats app समूहात
सामील व्ह्यायचे आहे,
त्यांनी मला आपल्या नावासह
whats app वर
add me असा मेसेज करा.
आपल्या मागणीनुसार
लिंक दिली जाईल.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...