Wednesday, August 7, 2019

बोकडांचा माज



आजची वात्रटिका
------------------------------------
बोकडांचा माज
माजलेल्या बोकडांचे
परस्परांशी शेअरींग वाढू लागते.
एकदा श्रावण लागला की,
बोकडांची डेअरींग वाढू लागते.
बोकडांच्या माजोरीपणाला
श्रावणाचा साज चढू लागतो !
श्रावणाच्या पाठींब्यामुळे
बोकडांचा माज वाढू लागतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7031
दैनिक झुंजार नेता
7ऑगस्ट2019
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

daily vatratika..19april2024