Wednesday, August 14, 2019

स्वातंत्र्याचा अर्थ



आजची वात्रटिका
------------------------------------
स्वातंत्र्याचा अर्थ
स्वातंत्र्याचा प्रवास
वाट्टेल तसा आहे.
स्वातंत्र्याचा अर्थ
स्वैराचार असा आहे.
ओरडतो-आरडतो त्याचा,
कोरडाठाक घसा आहे.
इंग्रजांनी कल्पिला होता,
गोंधळ जसाच्या तसा आहे.
चोर झाले करोडपती,
त्यांचाच पुढे वसा आहे.
कंगाल झाले कंगाल,
फाटका आमचा खिसा आहे.
इस्रोची कमाल बघून
जरी अवाक नासा आहे !
जय इंडिया,जय हिंदूस्थान,
भारत मात्र प्यासा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7039
दैनिक झुंजार नेता
15ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...