Tuesday, August 6, 2019

370चा कलमनामा



आजची वात्रटिका
------------------------------------
370चा कलमनामा
जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाला,
अखेर तलाक दिला गेला आहे.
भारताच्या भूगोलात नाही,
जनरल नॉलेजात बदल झाला आहे.
एक राज्य कमी होऊन,
दोन केंद्रशासित प्रदेशाची वाढ आहे !
ज्यांना पोलादी पुरुषाचे दर्शन झाले,
त्यांची भक्तीच तेवढी गाढ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5531
दैनिक पुण्यनगरी
6ऑगस्ट2019
-------------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...