Wednesday, May 31, 2023
भ्रष्ट दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
प्री वेडिंग शूटिंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Tuesday, May 30, 2023
प्रायव्हेट लिमिटेड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
प्रायव्हेट लिमिटेड
जसे धर्मभूषण वाढू लागले,
तसे जातीभूषण वाढू लागले.
एकेकाच्या गळ्यामध्ये,
कसले पुरस्कार पडू लागले.
पुरस्कार देणे आणि घेणे,
कुणाकुणाचे मिशन आहे !
घेणारा आणि देणारालाही,
पुरस्कारांचे भूषण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8266
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30म22023
सकारात्मक विरोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
सकारात्मक विरोध
सत्याधाऱ्यांएवढेच विरोधकांनाही,
संसदीय लोकशाहीत महत्त्व आहे.
मजबूत आणि सकारात्मक विरोध,
हेच संसदीय लोकशाहीचे सत्व आहे.
जेवढी सकारात्मक मजबुती,
तेवढेच मजबूत संख्याबळ पाहिजे.
लोकशाहीत आकडेशाही महत्त्वाची,
डोक्यात सतत हीच ओळ पाहिजे.
सत्ताधाऱ्यांना हुकूमशाह म्हणू शकतो,
त्यांच्या बहूमताला राक्षसी म्हणू शकतो!
पण याचाही विचार व्हायला हवा,
आपणही कधीतरी ते आणू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6819
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30मे2023
Monday, May 29, 2023
सेंगॉल आणि धर्मसंकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
सेंगॉल आणि धर्मसंकट
नव्या संसदेच्या उद्घाटनात,
सर्वधर्मसमभाव दिसत होता.
अशोक स्तंभकडे बघत मात्र,
वैज्ञानिक दृष्टिकोन हसत होता.
सर्वधर्मसमभाव नक्की दाखवला,
पण धर्मनिरपेक्षता दिसली नाही.
धर्मवेडे लोक फसू शकतील,
पण सुजाण जनता फसली नाही.
विरोधकांचा तर आरोप आहेच,
हे सगळेच गौडबंगाल आहे !
सध्या धर्मसंकटात अडकलेले,
राजदंड नावाचे सेंगॉल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8265
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29म22023
चमच्यांचा चमचमाट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
चमच्यांचा चमचमाट
कधी वाटतात ते तुमचे आहेत,
कधी वाटतात ते आमचे आहेत.
त्यांची हलवाहलवी बघून कळते,
हे तर सगळे पट्टीचे चमचे आहेत.
कधी त्यांची हलवाहलवी असते,
कधी त्यांची ढवळाढवळ असते.
स्वतःची एक वेगळी ओळख,
प्रत्येकच चमच्याजवळ असते.
चमकोगिरी आणि चमचेगिरी,
यांचा तर चमचमाट केला असतो!
आयजीच्या जीवावर बायजी उदार,
तरी चमच्यांकडून थाट केला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6818
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29मे2023
Sunday, May 28, 2023
राजकीय चित्रपट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
राजकीय चित्रपट
एकमेकांचे उरले सुरले कपडे,
नेते जाहीरपणे फेडायला लागले.
परस्परांच्या आयुष्यावरती,
नेते चित्रपट काढायला लागले.
चिमटे आहेत,लचके आहेत,
एकमेकांना जोरात लाफा आहेत.
चित्रपटांचे भाग भांडवल म्हणजे,
एकमेकांच्या तोंडाच्या वाफा आहेत.
चित्रपट जेवढे कॉमेडी होतील,
तेवढेच चित्रपट हॉरर असतील!
जेवढे साईडहिरो हिरो बनतील,
तेवढेच शेवटही टेरर असतील!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8264
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28म22023
मंदिरातील ड्रेस कोड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
मंदिरातील ड्रेस कोड
एका पाठोपाठ एका मंदिरात,
हळूहळू 'ड्रेस कोड'ची साथ आहे.
आंधळे भक्त खुशाल म्हणतील,
एवढे वावगे काय त्यात आहे?
कुणाचे उत्तेजक,कुणाचे तोकडे,
कुणाच्या अर्ध्या विजारी असतात.
पण सांगा त्यांचे काय करायचे?
जिथे उघडेबंब पुजारी असतात.
कुणालाच नागवे नाचू देऊ नका,
पण शहाणपण सक्तीने येत नसते !
नग्नता बघणारांच्याच नजरेत,
नग्नता कधीच कपड्यात नसते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6818
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28मे2023
Saturday, May 27, 2023
पाटील: की फॅक्टर..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
योगायोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
योगायोग
तुझ्या जाण्यापाठोपाठ,
योगायोगाने माझे येणे.
दोन हजाराच्या नोटेला म्हणाले,
पंचाहत्तर रुपयाचे नाणे.
दोन हजाराची भरली शंभरी,
पंचाहत्तरचे नाणे खणखणते आहे!
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात,
नवा रंग नवी संसद आणते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
दैनिक वात्रटिका
27मे2023
Friday, May 26, 2023
उद्घाटनाचे सिंहावलोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
उद्घाटनाचे सिंहावलोकन
नव्या संसद भवनाचे उद्घाटन,
विरोधकांना सलायला लागले.
निमंत्रितांसह बिन बुलाये मेहमान,
बहिष्कार घालायला लागेले.
बिन बुलाये मेहमानांचे करावे काय ?
निमंत्रितांचे आपण समजू शकतो !
इतिहासाचे सिंहावलोकन केले तर,
लोकशाही परंपराही उमजू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8263
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26म22023
सावधानतेचा सल्ला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
सावधानतेचा सल्ला
तुरुंगात जायचे की भाजपात?
असा विरोधकांना ऑप्शन आहे.
'हा देशातल्या दोन मदाऱ्यांचा खेळ'
सोबत 'प्रकाश'मान कॅप्शन आहे.
काटाकाटी आणि छाटाछाटीचा,
संदेशही यातून मिळाला आहे.
छोट्याबरोबर मोठा मासाही,
म्हणे भाजपाच्या गळाला आहे.
मदारी आणि माकडांवरतीही,
हा अगदी उघड उघड हल्ला आहे !
त्यात 'वकिली पॉईंट' असला तरी,
मित्राला सावधानतेचा सल्ला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
दैनिक मराठी वात्रटिका
26मे2023
Thursday, May 25, 2023
नवे संसद भवन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
जुळे,तिळे आणि खुळे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
जुळे,तिळे आणि खुळे
महाविकास आघाडीमधले,
तिघेही भाऊ भाव खाऊ लागले.
आपणच मोठे भाऊ असल्याचे,
ते नव नवे दाखले देऊ लागले.
कुणी ना मोठा;कुणी ना छोटा,
तसे सगळेच जुळे भाऊ आहेत.
जुळे म्हणण्यातही खुळेपणा आहे,
खरे तर ते तिळे भाऊ आहेत.
म्हणूनच मोठेपणाचा दावा,
ही निव्वळ राजकीय थाप आहे !
सत्य मातोश्री,आय किंवा तो सांगेल,
जो तिघांचाही राजकीय बाप आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6816
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25मे2023
Wednesday, May 24, 2023
अहंकार लीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
अहंकार लीला
जशी पक्षाबाहेर चढाओढ असते,
तशी पक्षांतर्गतही चढाओढ असते.
दोन्हीही चढाओढींना,
अहंकाराची खोड आणि जोड असते .
जिकडे तिकडे आपापला अहंकार,
सतत हळुवारपणे कुरवाळला जातो !
जो जो डोईजड वाटू लागतो,
तो तो सोयीस्करपणे टाळला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8261
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24म22023
चलन व्यवस्थापन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Tuesday, May 23, 2023
जशास तसे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
जशास तसे
विरोधकांचे कच्चे दुवे,
अगदी बरोबर हेरले जातात.
जिथे संधी असेल तिथे
आपली माणसं पेरले जातात.
तुम्हीही कुणाचे तरी,
नक्की विरोधक असू शकता!
दुसरीकडे माणसे पेरताना,
तुम्ही स्वतःलाच दिसू शकता!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
23म22023
दोन हजाराच्या नोटेचे मनोगत..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Monday, May 22, 2023
राजकीय भावार्थ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
राजकीय भावार्थ
कधी छोटा भाऊ मोठा होतो,
कधी मोठा भाऊसुद्धा छोटा होतो.
व्यवहारात झाला नाही तरी,
राजकारणात मात्र हा तोटा होतो.
छोट्याचा मोठा भाऊ होण्यात,
राजकीय स्वार्थ दडलेला असतो!
पक्षीय मोठेपणा मिळविण्यात,
राजकीय भावार्थ दडलेला असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
22म22023
चलती का नाम गाडी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
चलती का नाम गाडी
आघाड्यांचा आणि युत्यांचा,
खेळच खरोखर न्यारा असतो.
आघाडी आणि युतीधर्म निभावताना,
सर्वांना आपला पक्षच प्यारा असतो.
किमान समान कार्यक्रम करून,
एक कॉमन अजेंडा आखला जातो.
विसंवादावर विसंवाद झाले तरी,
मजबुरीपुढे अहंकार झुकला जातो.
आघाडी आणि युती तुटत नाही,
ही कल्पनाच तशी भ्रामक असते !
चलती का नाम गाडी...
आघाडी आणि युतीचे गमक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6813
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22मे2023
Sunday, May 21, 2023
उपऱ्यांचे कौतुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
अंदाज अपना अपना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
अंदाज अपना अपना
मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे,
जेंव्हा जेंव्हा वाहायला लागतात.
इच्छुक आमदार आणि खासदार,
दिवसा स्वप्न पाहायला लागतात.
उतावळे नवरे;गुडघ्याला बाशिंग,
सगळे नटून थटून मोकळे होतात.
मीडियावाली वऱ्हाडी मंडळी तर,
खातीसुद्धा वाटून मोकळे होतात.
कुणा कुणाची लागते लॉटरी,
कुणाची ढगात गोळी बसू शकते!
लिंबू टिंबूंच्या काळजामध्ये,
अपेक्षाभंगाची कट्यार घुसू शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6812
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21मे2023
Saturday, May 20, 2023
नजरबंदी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आणखी एक नोटाबंदी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
आणखी एक नोटाबंदी
गुलाबी गुलाबी स्वप्नांच्या,
गळ्याचाच हा जणू घोट आहे.
नोटाबंदीच्या जाळ्यात,
आता दोन हजाराची नोट आहे.
आधीच दुर्मिळ;त्यात पुन्हा बंदी,
असा डबल गेम होतो आहे.
प्यारे बहनो और भाईयों....
आवाज कुठून तरी येतो आहे.
रिझर्व बँकेचे निर्णय,
तुम्हा आम्हाला बाध्य होतील!
पूर्वीच्या नोटाबंदीचे उद्दिष्टे,
किमान आता तरी साध्य होतील!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6811
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20मे2023
Friday, May 19, 2023
हायटेक कॉप्या...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
नंगे से खुदा डरे!...
-------------------------
नंगे से खुदा डरे!
देवीच्या भाविक भक्तांवरती,
सभ्य कपडे घालायची सक्ती आहे.
अपुऱ्या कपड्यांमध्ये अडकलेली,
तमाम भाविक भक्तांची भक्ती आहे.
नियम फक्त प्रौढांसाठी लागू,
अशी ' ए ग्रेड ' ची नोटीस आहे.
नंगे से खुदा डरे,
खरी अर्थप्राप्ती या कोटीस आहे.
नो अंग प्रदर्शन;नो दर्शन,
फॅशनेबल भक्त लाले लाल आहे !
आसरा म्हणाल्या म्हसोबाला,
आपले बरे,ओपन टू ऑल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6809
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19मे2023
Thursday, May 18, 2023
मजबूरी का नाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
मजबूरी का नाम...
सगळेच लोक मजबूर आहेत,
याचेच तर खरे वांधे आहेत.
लोकांच्या मजबूरीचे कारण,
लोक कुणाचे तरी मिंधे आहेत.
मजबूरी का नाम मिंधेगिरी,
हाच आजचा बाणा आहे !
उलट प्रश्न विचारायलाही,
इथे अगदी सक्त मना आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
18मे2023
पॉलिटिकल प्रमोशन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------------
पॉलिटिकल प्रमोशन
जे निव्वळ अशोभनीय आहे,
तेच नेमके त्यांना शोभू लागले.
आज काल चित्रपटांनाही,
पॉलिटिकल प्रमोशन लाभू लागले.
ज्याचे त्याचे प्रमोशन,
ज्याला त्याला लखलाभ असो.
पण ह्या घातक परंपरा आहेत,
लक्षात एवढी तरी बाब असो.
चित्रपटांचे प्रमोशन नको,
चित्रपटांचे फुकटचे शो नकोत !
चित्रपटांच्या माध्यमातून,
कुणाचे राजकीय खो खो नकोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6809
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18मे2023
Wednesday, May 17, 2023
ईव्हीएम वाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
ट्रॅप अलर्ट ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Tuesday, May 16, 2023
वशिल्याचे तट्टू.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...