Sunday, May 21, 2023

अंदाज अपना अपना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अंदाज अपना अपना

मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे,
जेंव्हा जेंव्हा वाहायला लागतात.
इच्छुक आमदार आणि खासदार,
दिवसा स्वप्न पाहायला लागतात.

उतावळे नवरे;गुडघ्याला बाशिंग,
सगळे नटून थटून मोकळे होतात.
मीडियावाली वऱ्हाडी मंडळी तर,
खातीसुद्धा वाटून मोकळे होतात.

कुणा कुणाची लागते लॉटरी,
कुणाची ढगात गोळी बसू शकते!
लिंबू टिंबूंच्या काळजामध्ये,
अपेक्षाभंगाची कट्यार घुसू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6812
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21मे2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...