आजची वात्रटिका
-------------------------
शरदनीती
एका राजीनाम्याचा प्रभाव,
बघा कसा आणि किती आहे?
कळली नाही, वळलीही नाही,
हीच पवारांची 'शरदनीती' आहे.
हा काही निव्वळ योगायोग नाही,
हे तर अफलातून टायमिंग आहे.
खेळण्यात आणि खेळविण्यात,
एक वेगळीच अशी झिंग आहे.
काय होईल?कसे होईल?
याचे काळाकडेच उत्तर आहे !
ही कळ्या दगडावरची रेघ,
हा वीट का जवाब पत्थर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8245
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3मे2023

No comments:
Post a Comment