Thursday, May 4, 2023

राजकारणग्रस्त प्रकल्प...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकारणग्रस्त प्रकल्प

प्रकल्पांचे राजकारण करण्यात,
इथे जो तो नको तेवढा व्यस्त आहे.
प्रकल्पांच्या संभाव्य प्रदूषणापेक्षा,
इथे राजकीय प्रदूषण जास्त आहे.

राजकीय प्रदूषण तेव्हाच कमी होईल,
जेव्हा बाजू निःपक्षपणे मांडली जाईल.
इको फ्रेंडली प्रोजेक्ट तेव्हाच होतील,
जेव्हा राजकारण इको फ्रेंडली होईल.

प्रत्येकच वेळी; प्रत्येक पक्षाचा,
अगदीच वेगळा वेगळा पक्ष आहे !
बारासू म्हणाले नाणारला,
पूरावा म्हणून एन्रॉनची साक्ष आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6796
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4मे2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 172 वा l पाने -39 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/18nApDbukudT7hlNNJ...