Friday, May 5, 2023

कौटुंबिक निर्णय....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कौटुंबिक निर्णय

पक्ष म्हणजे एक कुटुंब असते,
पण एक कुटुंब म्हणजे पक्ष नाही.
भावनिक गदारोळात,
जणू कुणाचेच याकडे लक्ष नाही.

आपला कौटुंबिक निर्णय,
कुणी पक्षावर लादता कामा नये.
पक्षाला अंधारात ठेवून,
कौटुंबिक स्वार्थ साधता कामा नये.

जेव्हा कौटुंबिक निर्णयच,
राजकीय पक्षावरती रेटला जातो!
तेंव्हा घराणेशाहीत लोकशाहीचा,
गळा अलगदपणे घोटला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6797
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5मे2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...