Sunday, May 28, 2023

मंदिरातील ड्रेस कोड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मंदिरातील ड्रेस कोड

एका पाठोपाठ एका मंदिरात,
हळूहळू 'ड्रेस कोड'ची साथ आहे.
आंधळे भक्त खुशाल म्हणतील,
एवढे वावगे काय त्यात आहे?

कुणाचे उत्तेजक,कुणाचे तोकडे,
कुणाच्या अर्ध्या विजारी असतात.
पण सांगा त्यांचे काय करायचे?
जिथे उघडेबंब पुजारी असतात.

कुणालाच नागवे नाचू देऊ नका,
पण शहाणपण सक्तीने येत नसते !
नग्नता बघणारांच्याच नजरेत,
नग्नता कधीच कपड्यात नसते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6818
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28मे2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...