Friday, May 5, 2023

रिव्हर्स स्विंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रिव्हर्स स्विंग

कुणाला वाटले यॉर्कर आहे,
कुणाला वाटले गुगली आहे.
वादाला नवे तोंड फोडणारी,
ही तर चक्क एक चुगली आहे.

पवारांच्या स्वेच्छा निवृत्तीचे,
न फुटलेले बिंग वाटत आहे!
कालचा यॉर्कर आणि गुगली,
आज रिव्हर्स स्विंग वाटत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8247
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5मे2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...