Monday, May 1, 2023

स्वामीनिष्ठ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
स्वामीनिष्ठ
आपली स्वामीनिष्ठ दाखवायची,
कार्यकर्ते संधी सोडत नाहीत.
आपली स्वामिनिष्ठ दाखविण्यासाठी,
कार्यकर्ते संधीवाचून अडत नाहीत.
आपल्या स्वामीनिष्ठतेचा,
कार्यकर्त्यांना अंदाजच येत नाही !
कितीही स्वामी बदलले तरी,
त्यांची स्वामीनिष्ठ कमी होत नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8244
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे

1मे2023 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...