आजची वात्रटिका
------------------------
डार्विन आणि माकडचाळे
चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद,
अजूनही कुणाला रेटता रेटत नाही.
माकडासारखे वागणाऱ्यांनाही,
डार्विनचा उत्क्रांतीवाद पटत नाही.
माकडांसमोर नाक खाजवले की,
उत्क्रांतीवाद पुन्हा चिघळला जातो.
चार्ल्स डार्विनचा धडाही मग,
अभ्यासक्रमातून वगळला जातो.
जे जे वगळले,जाळले,चिरडले,
ते तेच पुढे चिरंजीव ठरले आहेत !
समाज त्यांनाच गौरवाने उल्लेखतो,
जे जे अनुल्लेखाने मारले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6794
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1मे2023

No comments:
Post a Comment