आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय स्वेच्छा निवृत्ती
राजकारणात दुर्मिळ वाटावी,
अशीच ही राजकीय वृत्ती आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून,
पवारांची स्वेच्छा निवृत्ती आहे.
निर्णय पक्षांतर्गत असला तरी,
वज्रमूठीलाही खूप धोके आहेत.
लोण्यासाठी टपून बसलेले,
जिकडे तिकडे खूप बोके आहेत.
नाराजीनामे आणि भावूकता,
यांची पक्षांतर्गत मोठी लाट आहे !
फिरवलेली भाकरीच सांगेल,
कुणाकुणाला कात्रजचा घाट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6795
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3मे2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment