Friday, May 19, 2023

नंगे से खुदा डरे!...

आजची वात्रटिका
-------------------------

नंगे से खुदा डरे!

देवीच्या भाविक भक्तांवरती,
सभ्य कपडे घालायची सक्ती आहे.
अपुऱ्या कपड्यांमध्ये अडकलेली,
तमाम भाविक भक्तांची भक्ती आहे.

नियम फक्त प्रौढांसाठी लागू,
अशी ' ए ग्रेड ' ची नोटीस आहे.
नंगे से खुदा डरे,
खरी अर्थप्राप्ती या कोटीस आहे.

नो अंग प्रदर्शन;नो दर्शन,
फॅशनेबल भक्त लाले लाल आहे !
आसरा म्हणाल्या म्हसोबाला,
आपले बरे,ओपन टू ऑल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6809
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19मे2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...