आजची वात्रटिका
--------------------------
4 ऑगस्ट 2024
दारुडा म्हणे बाटलीला,
आपली मैत्री तुटायची नाय.
किती ब्रँड आले गेले?
आपली मैत्री सुटायची नाय.
गटारीला फ्रेंडशिप डे आला,
हे खरे मैत्रीचे लक्षण आहे.
मित्राकडूनच मित्राला,
दारू पिण्याचे शिक्षण आहे.
गटारी आणि फ्रेंडशिप डे,
हे खरे सांस्कृतिक ऐक्य आहे !
विश्वास ठेव किंवा नको ठेवू,
ते तर तरी टाळीचे वाक्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8643
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4ऑगस्ट2024
No comments:
Post a Comment