Wednesday, August 14, 2024

मूल्यमापनाचा दृष्टिकोन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मूल्यमापनाचा दृष्टिकोन

स्पष्टवक्तेपणा आणि तोंडफाटकेपणा,
यात फक्त सत्तेचे अंतर असते.
हातामध्ये सत्ता नसेल तर,
स्पष्टवक्त्यांचेही तोंड फाटके दिसते.

कुणाकडून चापून चोपून बोलले जाते,
कुणी बिनधास्त आणि बेधडक असतो.
हातामध्ये सत्ता असली की,
बोलणारा करारी आणि कडक असतो.

जरा अवती भोवती बघा,
कुणाला काय काय बोलले जात आहे ?
गुणाला आणि अवगुणालाही,
सत्तेच्याच मापाने तोलले जात आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8653
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14ऑगस्ट2024
 

No comments:

daily vatratika...29jane2026