Wednesday, August 21, 2024

उघड सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उघड सत्य

हे सत्य अगदी सरळ आहे,
हे सत्य जराही खोचक नाही.
पुन्हा पुन्हा सिद्ध होऊ लागले,
कुणावरच कायद्याचा वचक नाही.

अन्याय आणि अत्याचाराचे,
सगळीकडे थैमान माजले आहे.
सत्ता संपत्तीच्या जोरावरती,
कायद्यालाच पाणी पाजले आहे.

माणूस माणूस राहिला नाही,
तो माणसातला नर पशु आहे !
घटना कितीही अमानवी असो,
तिथे राजकारण हाच इश्यू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8659
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21ऑगस्ट2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...