Tuesday, August 27, 2024

बंडाचे निशाण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
बंडाचे निशाण
जागा वाटपाच्या तिढ्यात,
सगळेच अडकू लागले.
जिकडे बघावे तिकडे,
बंडाचे निशाण फडकू लागले.
बंडाच्या निशाणाला,
शरणागतीने उत्तर आहे.
ज्यांची घरं काचेची आहेत,
त्यांच्याही हाती पत्थर आहे.
पक्ष -पक्षांच्या अब्रूला,
सगळीकडूनच तडे आहेत!
तहाच्या पांढऱ्या निशाणाला,
छावणीमधूनच घोडे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8665
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27ऑगस्ट2024

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 110वा

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 110वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1_qfpBEYsrxLQalWrUFw...