Tuesday, August 6, 2024

संतुलन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संतुलन

हे त्यांचे फोडायला लागले,
ते यांचे फोडायला लागले आहेत.
जे कुणी नाराज आहेत,
तेही मार्ग काढायला लागले आहेत.

कुणाला बसू लागले धक्के,
कुणी कुणी विचलित होत आहेत.
फोडाफोडी आणि ओढा-ओढीने,
समीकरणं संतुलित होत आहेत.

राजकीय समीकरणाचे संतुलन,
ही अपरिहार्य अशीच गोष्ट आहे !
जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची,
सगळ्याच पक्षांकडे लिस्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8645
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6ऑगस्ट2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...