Sunday, August 18, 2024

वर्तन बदल ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वर्तन बदल

ज्यांनी पाच वर्षे विचारले नाही,
तेच आता भेटायला येवू लागले.
ज्यांनी अंगाचा वारा लागू दिला नाही,
तेच आता खेटायला येऊ लागले.

यात्रा जत्रा सुरू झाल्या,
त्यांच्या पायाला आता भवरे आहेत.
कुणाच्या वाढल्या गाठीभेटी,
कुणा कुणाचे जनसंपर्क दौरे आहेत.

ज्यांच्यासमोर लोकांनी नाक घासले,
तेच लोकांच्या हातापाया पडू लागले !
फक्त एका निवडणुकीच्या चाहूलीने,
हे सगळे चमत्कार घडू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8656
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18ऑगस्ट2024
 

No comments:

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- वेडी आशा जसा न्याय खरीदला जातो, तसा न्याय विकला जातो. न्याय मिळेल या आशेवरती, न्यायसुद्धा टिकला जातो. कि...