आजची वात्रटिका
--------------------------
प्रोफेशनल पॉलिटिक्स
यांच्याही दारात रांग आहे,
त्यांच्याही दारात राग आहे.
ज्यांनी नाकारले तिकीट,
त्यांच्या नानाची टांग आहे.
घेणारा समोर नाही तर,
देणाऱ्यांसाठी पेच आहेत.
इकडच्या आणि तिकडच्या,
रांगेतले इच्छुक तेच आहेत.
आज कालचे राजकारण,
किती व्यावसायिक झाले आहे?
ज्याने दिले तिकीट,
त्याच्या नावाचे चांगभले आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8641
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2ऑगस्ट2024
No comments:
Post a Comment