आजची वात्रटिका
--------------------------
सुपारीचे प्रत्युत्तर
निषेधाचे राजकारण बघा,
कुठपर्यंत जाऊन टेकले आहे?
त्यांनी सुपार्या उधळल्या म्हणून,
यांनी चक्क शेण फेकले आहे.
सुपार्याला उत्तर म्हणून,
शेणासोबत बांगड्या आहेत.
समर्थनार्थ केलेल्या सबबीही,
तोकड्या आणि लंगड्या आहेत.
ज्या गावच्या बाभळी आहेत,
अगदी त्याच गावच्या बोरी आहेत !
सेनापतींचे रंगले वाक् युद्ध,
घाव मात्र सैनिकांच्या उरी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8650
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11ऑगस्ट2024
No comments:
Post a Comment