Thursday, August 15, 2024

स्वातंत्र्याचा भेदभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

स्वातंत्र्याचा भेदभाव

अगदी नेमकेपणाने सांगू का,
ज्याचे त्याचे स्वातंत्र्य केवढे आहे?
ज्याची ज्याची जेवढी ऐपत,
त्याचे स्वातंत्र्य अगदी तेवढे आहे.

इथे प्रत्येकाच्या स्वातंत्र्यात,
अगदी मूलभूत असा फरक आहे.
कुणाचे स्वातंत्र्य म्हणजे स्वर्ग,
कुणाचे स्वातंत्र्य म्हणजे नरक आहे.

तरीही हम सब एक है,
असे कुणा कुणाचे आव आहेत!
इथे प्रत्येक जण स्वतंत्र असला तरी,
स्वातंत्र्याचे वेगवेगळे भाव आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8654
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15ऑगस्ट2024
 

No comments:

daily vatratika...29jane2026