Thursday, August 22, 2024

सामाजिक स्वभाव ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सामाजिक स्वभाव

झोपेत धोंडा बसला की,
लोक तेवढ्यापुरते जागे होतात.
काही करतात आरडाओरडा,
काही निव्वळच बघे होतात.

जे बघे आहेत त्यांच्यासाठी तमाशा,
जे जागे आहेत त्यांचे नाटक असते.
जिथे तिथे हात धुवून घेण्याची,
राजकारणाला तर चटक असते.

काही दिवस सरून गेले की,
पुन्हा मागचे पाढे पुढे असतात !
एकदा वरात निघून गेली की,
वराती पाठीमागून घोडे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8660
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22ऑगस्ट2024
 

No comments:

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- वेडी आशा जसा न्याय खरीदला जातो, तसा न्याय विकला जातो. न्याय मिळेल या आशेवरती, न्यायसुद्धा टिकला जातो. कि...