Saturday, August 3, 2024

राजकीय संन्यास....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय संन्यास

विरोधकांना आव्हान देण्याची,
ज्याला त्याला राजकीय नशा आहे.
म्हणूनच राजकीय संन्यास घेण्याची,
ज्याच्या त्याच्या तोंडी भाषा आहे.

आव्हान देणारा आणि पेलणारा,
अजून तरी कुणीच जितलेला नाही
संन्यास घेण्याची भाषा करूनही,
अजून कुणीच संन्यास घेतलेला नाही.

बोलाचीच कढी;बोलाचाच भात,
फक्त भिमकायी थाट पाहतो आहे !
आव्हान देणारा - घेणाराला सांगा,
हिमालय तुमची वाट पाहतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8642
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3ऑगस्ट2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 110वा

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 110वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1_qfpBEYsrxLQalWrUFw...