आजची वात्रटिका
--------------------------
आरोपांचे बार
काही प्रसंग घडून येतात,
काही प्रसंग घडवले जातात..
निवडणुकांच्या तोंडावरती,
आरोपांचे बार उडवले जातात.
आरोपांचे बार उडवले की,
संशयाचा धूर पसरला जातो.
संशयाच्या धुराड्यात मग,
सारासार विवेक विसरला जातो.
सगळा आरोपांचा दारूगोळा,
निवडणुकांसाठी वापरला जातो !
खऱ्या खोट्याच्या संभ्रमात,
मतदार मात्र ढोपरला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8644
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5ऑगस्ट2024
No comments:
Post a Comment