Thursday, August 8, 2024

विनेश फोगट च्या निमित्ताने ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विनेश फोगट च्या निमित्ताने

सेकंदाप्रमाणे ग्रॅमचे महत्त्व सांगताना,
ऑलिंपिकचे उदाहरण दिले जाऊ शकते.
फक्त 100 ग्रॅम वाढीव वजनामुळे,
ऑलिंपिकचे पदकही गेले जाऊ शकते.

आपल्या स्वप्नांचा खेळखंडोबा झाला,
पण यशानेच अपयश धुतले पाहिजे.
पदरात पडलेले अपयशसुद्धा,
आपण खिलाडूवृत्तीने घेतले पाहिजे.

आता तमाम भारतीयांचे दुःख,
कानी कपाळी मारले जाऊ शकते !
आता वेट लॉस वाल्यांकडून,
याच दुःखाची जाहिरात होवू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8647
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8ऑगस्ट2024
 

No comments:

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- वेडी आशा जसा न्याय खरीदला जातो, तसा न्याय विकला जातो. न्याय मिळेल या आशेवरती, न्यायसुद्धा टिकला जातो. कि...