Thursday, August 1, 2024

विधान - सभा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विधान - सभा

ते म्हणाले,ठोकून काढा,
हे म्हणाले,संपवून टाकू.
ही त्यांचीच विधानं आहेत,
आम्ही कशाला मनाने फेकू?

ते यांना खिजवत म्हणाले,
हे घोटाळ्यांचे सरदार आहेत.
हे उत्तरादाल दाखल म्हणाले,
ते तर चक्क तडीपार आहेत.

जागृत झाले बोलबच्चन,
जागृत झाले चिंट्या पिंट्या !
तेवढ्यात कुणीतरी म्हणाले,
वाजल्या की नाही घंट्या ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8640
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1ऑगस्ट2024
 

No comments:

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- वेडी आशा जसा न्याय खरीदला जातो, तसा न्याय विकला जातो. न्याय मिळेल या आशेवरती, न्यायसुद्धा टिकला जातो. कि...