Saturday, August 31, 2024

उलट्या आणि बोंबा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उलट्या आणि बोंबा

आपल्याला उलट्या झाल्याच्या,
कुणी कुणी बोंबा ठोकू लागले.
झालेल्या उलट्याचे प्रकरण,
महायुतीच्या आरोग्यावर शेकू लागले.

कधी काळच्या तिटकाऱ्याची,
पोटामध्ये अचानक वळवळ आहे.
थोडीफार बाहेर पडली तरी,
पोटामध्ये अजूनही मळमळ आहे.

कुणाच्या मनात शंका कुशंका,
कुणी कुणी कासावीस झाले आहेत !
कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ,
दिवस नक्कीच गेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8669
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31ऑगस्ट2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...