Showing posts with label अपेक्षा. Show all posts
Showing posts with label अपेक्षा. Show all posts

Tuesday, April 14, 2026

अपेक्षा.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अपेक्षा
महापुरुष वाचण्यासाठी नाही,
नाचण्यासाठी योग्य वाटू लागले आहेत.
महापुरुष वाचणाऱ्यापेक्षा,
नाचणारेच जास्त भेटू लागले आहेत.
डोक्यावर घेऊन नाचले पाहिजेत,
डोक्यात घेण्यासाठी वाचले पाहिजेत.
नाचता नाचता आणि वाचता वाचता,
सगळेच महापुरुष वेचले पाहिजेत.
डीजेच्या तालावर थिरकण्यापेक्षा,
वैचारिकता ताल धरता आला पाहिजे !
आपल्या आणि इतरांच्याही मनात,
महापुरुष अलगद पेरता आला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9247
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 एप्रिल 2026

 

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...