Showing posts with label उद्धवा अजब तुझे सरकारआजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label उद्धवा अजब तुझे सरकारआजची वात्रटिका. Show all posts

Thursday, March 26, 2026

उद्धवा अजब तुझे सरकार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
उद्धवा अजब तुझे सरकार
आरोपावर आरोप झाले,
आरोपांचा आगडोंब झाला.
जो निरोप समारंभ होता,
त्याचा आरोप समारंभ झाला.
कवितावर कविता झाल्या,
शायरीवर शायरी वाचली गेली.
विंदा,गदिमा आणि सुरेश भटांपर्यंत,
राजकीय भावना पोचली गेली.
उद्धवा अजब तुझे सरकार...
विधानभवनात सुर घुमत होते !
आरोप की निरोप समारंभ?
यावरती मात्र सर्वांचे दुमत होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9228
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26मार्च 2026
----------------------------
नमस्कार,

 

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...