Showing posts with label कौटुंबिक न्याय. Show all posts
Showing posts with label कौटुंबिक न्याय. Show all posts

Tuesday, June 9, 2026

कौटुंबिक न्याय ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------
कौटुंबिक न्याय
कुटुंबातल्या अनेकांना पदे,
आपल्याला वाटते हे काय आहे?
राजकीय पक्षा- पक्षाच्या मते,
हा तर खरा कौटुंबिक न्याय आहे.
पक्षात जशी अनुकंपा योजना,
तसे कौटुंबिक पुनर्वसनही केले जाते.
याची उदाहरणे तुम्हीच मोजा,
किती किती जणांना पद दिले जाते?
भाऊ,बहीण;पोरगा,पोरगी,पुतण्या,
कधी बाप तर; कधी माय आहे !
आपण ज्याला घराणेशाही म्हणतो,
त्यांच्या मते तो कौटुंबिक न्याय आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9302
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9जून 2026

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 59 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...