Showing posts with label खरात फाईल्स. Show all posts
Showing posts with label खरात फाईल्स. Show all posts

Friday, March 27, 2026

खरात फाईल्स ....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
खरात फाईल्स
जे पोळले ते पोळले गेले,
आता राजकारण खेळले जात आहे.
ज्याला ज्याला माळता येईल,
त्याला त्याला माळले जात आहे.
सगळे बोलविते धनी आहेत,
सगळे एकाच माळेचे मणी आहेत !
कोण किती पाण्यात आहे?
सामान्य लोक तेवढे ज्ञानी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 115
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
27मार्च 2026

 

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...