Showing posts with label चळवळ जिंदाबाद !. Show all posts
Showing posts with label चळवळ जिंदाबाद !. Show all posts

Saturday, June 6, 2026

चळवळ जिंदाबाद !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
चळवळ जिंदाबाद !
जशी चळवळ असते वेगळी,
तसा पक्षही वेगळा असतो.
दोघांनाही एक मानणारांचा,
इथेच घोळ सगळा असतो.
चळवळीचा पक्ष झाला की,
त्यात राजकारण घुसले जाते.
चळवळीच्या मूळ मुद्द्याचे,
हमखास बुड बसले जाते.
राजकारण आणि चळवळी,
वेगळ्या नजरेने पाहिल्या पाहिजेत!
राजकारण निरपेक्ष चळवळी,
सतत उभ्या राहिल्या पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9299
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 जून 2026

 

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 59 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...