Showing posts with label महागाईचे मूळ. Show all posts
Showing posts with label महागाईचे मूळ. Show all posts

Tuesday, June 2, 2026

महागाईचे मूळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
महागाईचे मूळ
वाढत्या महागाईच्या आगीचा,
रोज नव्याने धाक आहे.
इंधन दरवाढीसोबत फिरणारे,
वाढत्या महागाईचे चाक आहे.
एकदा इंधन दरवाढ झाली की,
महागाई गरागरा फिरू लागते.
कालची जाणवणारी महागाई,
आज चक्क स्वस्ताई ठरू लागते.
कितीही आर्थिक नियोजन करा,
तरीही महागाईची झळ आहे !
इंधन दरवाढीमध्येच,
वाढत्या महागाईचे मूळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9295
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 जून 2026

 

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 59 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...