Saturday, August 31, 2024

दैनिक वात्रटिका l 31ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 92 वा

दैनिक वात्रटिका l 31ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 92 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

उलट्या आणि बोंबा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उलट्या आणि बोंबा

आपल्याला उलट्या झाल्याच्या,
कुणी कुणी बोंबा ठोकू लागले.
झालेल्या उलट्याचे प्रकरण,
महायुतीच्या आरोग्यावर शेकू लागले.

कधी काळच्या तिटकाऱ्याची,
पोटामध्ये अचानक वळवळ आहे.
थोडीफार बाहेर पडली तरी,
पोटामध्ये अजूनही मळमळ आहे.

कुणाच्या मनात शंका कुशंका,
कुणी कुणी कासावीस झाले आहेत !
कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ,
दिवस नक्कीच गेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8669
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31ऑगस्ट2024
 

Friday, August 30, 2024

daily vatratika...30aug2024


 

फटकळ विचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फटकळ विचार

यांचा त्यांना धक्का आहे,
त्यांचा यांना धक्का आहे.
फोडा आणि राज्य करा,
सर्वांचाच इरादा पक्का आहे.

फोडले काय? फुटले काय?
सारखाच तर मामला आहे.
पक्ष कुठलाही असला तरी,
फोडाफोडीतच रमला आहे.

राजकीय फोडाफोडी बाबतचा,
आमचा विचार फटकळ आहे !
त्यांच्यासाठी फोडाफोडी म्हणजे,
किरकोळ आणि फुटकळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8668
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30ऑगस्ट2024
 

Thursday, August 29, 2024

दैनिक वात्रटिका l 29ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 90 वा

दैनिक वात्रटिका l 29ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 90 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

पुतळा का कोसळला आहे?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुतळा का कोसळला आहे?

सागराच्या लाटापेक्षा मोठा,
गोंधळ उसळला आहे.
जो तो विचारू लागला,
पुतळा का कोसळला आहे ?

निषेधाच्या सुरात सुर,
ज्याने त्याने मिसळला आहे.
आपापला राजकीय स्वार्थ,
ज्याने त्याने घुसळला आहे.

लोक भावनेला गेले तडे,
नैतिक बुरुज ढासळला आहे !
हा प्रश्न मात्र अनुत्तरीत असेल,
पुतळा का कोसळला आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8667
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29ऑगस्ट2024
 

Wednesday, August 28, 2024

दैनिक वात्रटिका l 28ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 89 वा

दैनिक वात्रटिका l 28ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 89 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

फुकटची क्रॉस चेकिंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फुकटची क्रॉस चेकिंग

आपले सरकार झाले उदार,
लोक मात्र स्वार्थी आहेत.
फुकटच्या सरकारी योजनांचे,
अगदी तेच तेच लाभार्थी आहेत.

फुकटच्या सरकारी योजना,
लोकप्रियतेतही हिट आहेत.
अटी व शर्ती कोणतेही असोत,
तेच तेच लोक फिट आहेत.

सरकारच्या लोकप्रियतेला,
सगळे फुकटे कारणीभूत आहेत!
माऊथ पब्लिसिटी करणारे,
फुकटेच खरे योजना दूत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8666
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28ऑगस्ट2024
 

Tuesday, August 27, 2024

दैनिक वात्रटिका l 27ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 88 वा


दैनिक वात्रटिका l 27ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 88 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बंडाचे निशाण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
बंडाचे निशाण
जागा वाटपाच्या तिढ्यात,
सगळेच अडकू लागले.
जिकडे बघावे तिकडे,
बंडाचे निशाण फडकू लागले.
बंडाच्या निशाणाला,
शरणागतीने उत्तर आहे.
ज्यांची घरं काचेची आहेत,
त्यांच्याही हाती पत्थर आहे.
पक्ष -पक्षांच्या अब्रूला,
सगळीकडूनच तडे आहेत!
तहाच्या पांढऱ्या निशाणाला,
छावणीमधूनच घोडे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8665
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27ऑगस्ट2024

 

Monday, August 26, 2024

दैनिक वात्रटिका l 26ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 87 वा


दैनिक वात्रटिका l 26ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 87 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

कायमचा धडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कायमचा धडा

लैंगिक अत्याचाराचे प्रकार,
प्रचंड प्रमाणात वाढू लागले.
जसे काही श्रावणालाच,
भाद्रपदाचे स्वप्न पडू लागले.

माजलेले आणि वखवखलेले,
मोकाट असे कुत्रे आहेत.
त्यांचा गैरसमज होऊ लागला,
इथले लोकच भित्रे आहेत.

कधीतरी जेल,नंतर बेल,
आपले धोरण आडमुठे आहे!
त्यांना असा धडा शिकवा की,
त्यांनी विचारावे,
दादा,माझे सामान कुठे आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8664
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26ऑगस्ट2024
 

Sunday, August 25, 2024

दैनिक वात्रटिका l 25ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 86 वा


दैनिक वात्रटिका l 25ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 86 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

आंदोलन विरुद्ध आंदोलन ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आंदोलन विरुद्ध आंदोलन

आंदोलनाविरुद्ध आंदोलन,
आंदोलनांची चढाओढ आहे.
सगळ्यांच्याच आंदोलनांचा,
आंदोलनावरती लोड आहे.

विरोधक आणि सत्ताधारी,
सगळे सेम टू सेम आहे.
आंदोलनानेच आंदोलनाचा,
ऑन द स्पॉट गेम आहे.

निषेधाचा विषय बाजूला,
आंदोलनांचा गाजावाजा आहे !
राजकीय बधिरता बघून,
चिंतीत महाराष्ट्र माझा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8663
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25ऑगस्ट2024
 

Saturday, August 24, 2024

daily vatratika...24aug2024


 

बंद:एक छंद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंद:एक छंद

आज यांचा बंद आहे,
उद्या त्यांचा बंद आहे.
आजकाल ज्याला त्याला,
जणू बंदचाच छंद आहे.

ज्याच्या त्याच्याकडून,
बंदचा छंद पुरा केला जातो.
जनतेला वेठीस धरून,
डाव तडीस नेला जातो.

आपल्या तीव्र भावनांसाठी,
लोकभावना मारल्या जातात !
ज्यांचे पोट भरलेले असते,
त्यांनाच बंद स्फुरल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8662
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24ऑगस्ट2024
 

Friday, August 23, 2024

दैनिक वात्रटिका l 23ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 84 वा l पाने -45अंक डाऊनलो


दैनिक वात्रटिका l 23ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 84 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

इच्छुकांच्या हालचाली...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

इच्छुकांच्या हालचाली

जिकडे बघावे तिकडे,
इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे.
आगामी निवडणुकांची,
हीच तर खरी वर्दी आहे.

इकडून नाकारलेले तिकडे,
तिकडून नाकारलेले इकडे आहेत.
पडायचे की पाडायचे ?
कुणाचे सवालही रोकडे आहेत.

दोन्ही- तिन्ही डगरीवरती,
ज्यांनी ठेवलेले हात आहेत !
तेच कधी यांची;कधी त्यांची,
आरतीवर आरती गात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8661
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23ऑगस्ट2024

Thursday, August 22, 2024

दैनिक वात्रटिका l 22ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 83 वा


दैनिक वात्रटिका l 22ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 83 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

सामाजिक स्वभाव ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सामाजिक स्वभाव

झोपेत धोंडा बसला की,
लोक तेवढ्यापुरते जागे होतात.
काही करतात आरडाओरडा,
काही निव्वळच बघे होतात.

जे बघे आहेत त्यांच्यासाठी तमाशा,
जे जागे आहेत त्यांचे नाटक असते.
जिथे तिथे हात धुवून घेण्याची,
राजकारणाला तर चटक असते.

काही दिवस सरून गेले की,
पुन्हा मागचे पाढे पुढे असतात !
एकदा वरात निघून गेली की,
वराती पाठीमागून घोडे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8660
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22ऑगस्ट2024
 

Wednesday, August 21, 2024

दैनिक वात्रटिका l 21ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 82 वा


दैनिक वात्रटिका l 21ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 82 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

उघड सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उघड सत्य

हे सत्य अगदी सरळ आहे,
हे सत्य जराही खोचक नाही.
पुन्हा पुन्हा सिद्ध होऊ लागले,
कुणावरच कायद्याचा वचक नाही.

अन्याय आणि अत्याचाराचे,
सगळीकडे थैमान माजले आहे.
सत्ता संपत्तीच्या जोरावरती,
कायद्यालाच पाणी पाजले आहे.

माणूस माणूस राहिला नाही,
तो माणसातला नर पशु आहे !
घटना कितीही अमानवी असो,
तिथे राजकारण हाच इश्यू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8659
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21ऑगस्ट2024
 

Tuesday, August 20, 2024

दैनिक वात्रटिका l 20ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 81 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 20ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 81 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

अपारंपरिक दृष्टिकोन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अपारंपरिक दृष्टिकोन

प्रथा आणि परंपरांच्याही,
नक्कीच काहीतरी व्यथा असतात.
जशा काही प्रथा चांगल्या,
तशा काही प्रथा कुप्रथा असतात.

प्रथा परंपरा पाळताना,
त्याची फेर मूल्यांकन झाले पाहिजे.
प्रथा परंपरा पुढे नेताना,
त्यांना नवे रूप देता आले पाहिजे.

ज्या टिकाऊ त्या टिकवल्या पाहिजेत,
ज्या टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत !
नव्या प्रथा परंपरा निर्माण करून,
आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8658
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20ऑगस्ट2024
 

Monday, August 19, 2024

दैनिक वात्रटिका l 19ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 80 वा

दैनिक वात्रटिका l 19ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 80 वा l पाने -25
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

भावनाशून्य सत्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भावनाशून्य सत्य

खरे बोलल्याने भावना दुखतात,
म्हणून कुणी खोटे बोलू नका.
इतरांना सुखावण्याच्या नादात,
कुणी नाकाने कांदे सोलू नका.

कुणाच्या भावना सुखावल्याने,
कोणतेच सत्य बदलत नाही.
कुणाच्या भावना दुखावल्याने,
कोणतेच सत्य बदलत नाही.

सत्य कोणतेही असले तरी,
सत्य हे भावनाशून्य असते !
कुणाच्या भावना बिवना दुखावणे,
हे सगळे परिस्थितीजन्य असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8657
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19ऑगस्ट2024
 

Sunday, August 18, 2024

दैनिक वात्रटिका l 18ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 79 वा


दैनिक वात्रटिका l 18ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 79 वा l पाने -25
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

वर्तन बदल ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वर्तन बदल

ज्यांनी पाच वर्षे विचारले नाही,
तेच आता भेटायला येवू लागले.
ज्यांनी अंगाचा वारा लागू दिला नाही,
तेच आता खेटायला येऊ लागले.

यात्रा जत्रा सुरू झाल्या,
त्यांच्या पायाला आता भवरे आहेत.
कुणाच्या वाढल्या गाठीभेटी,
कुणा कुणाचे जनसंपर्क दौरे आहेत.

ज्यांच्यासमोर लोकांनी नाक घासले,
तेच लोकांच्या हातापाया पडू लागले !
फक्त एका निवडणुकीच्या चाहूलीने,
हे सगळे चमत्कार घडू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8656
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18ऑगस्ट2024
 

Saturday, August 17, 2024

दैनिक वात्रटिका l 17ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक - 78 वा

दैनिक वात्रटिका l 17ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक - 78 वा l पाने -25
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

दंगल में मंगल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दंगल में मंगल

दंगलींच्या अंदाजाबाबत,
दंगल तज्ञांची एक वाक्यता आहे.
दंगलींचे अंदाज खरे ठरण्याची,
पुराव्यासहित शक्यता आहे.

सामाजिक सलोख्यामध्ये,
चिंता वाटावी असे दुरावे आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
रस्त्यावर दंगलीचे पुरावे आहेत.

लोकांचा हिंस्रपणा एवढा की,
असे वाटते हे श्वापदांचे जंगल आहे !
ज्यांना लुटता येतो फायदा,
त्यांच्यासाठी दंगल मे मंगल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8655
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17ऑगस्ट2024
 

Friday, August 16, 2024

दैनिक वात्रटिका l 16ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -77वा

दैनिक वात्रटिका l 16ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -77 वा l पाने -25
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

Thursday, August 15, 2024

daily vatratika...15aug2024


 

स्वातंत्र्याचा भेदभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

स्वातंत्र्याचा भेदभाव

अगदी नेमकेपणाने सांगू का,
ज्याचे त्याचे स्वातंत्र्य केवढे आहे?
ज्याची ज्याची जेवढी ऐपत,
त्याचे स्वातंत्र्य अगदी तेवढे आहे.

इथे प्रत्येकाच्या स्वातंत्र्यात,
अगदी मूलभूत असा फरक आहे.
कुणाचे स्वातंत्र्य म्हणजे स्वर्ग,
कुणाचे स्वातंत्र्य म्हणजे नरक आहे.

तरीही हम सब एक है,
असे कुणा कुणाचे आव आहेत!
इथे प्रत्येक जण स्वतंत्र असला तरी,
स्वातंत्र्याचे वेगवेगळे भाव आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8654
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15ऑगस्ट2024
 

Wednesday, August 14, 2024

दैनिक वात्रटिका l 14ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -75 वा

दैनिक वात्रटिका l 14ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -75 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

मूल्यमापनाचा दृष्टिकोन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मूल्यमापनाचा दृष्टिकोन

स्पष्टवक्तेपणा आणि तोंडफाटकेपणा,
यात फक्त सत्तेचे अंतर असते.
हातामध्ये सत्ता नसेल तर,
स्पष्टवक्त्यांचेही तोंड फाटके दिसते.

कुणाकडून चापून चोपून बोलले जाते,
कुणी बिनधास्त आणि बेधडक असतो.
हातामध्ये सत्ता असली की,
बोलणारा करारी आणि कडक असतो.

जरा अवती भोवती बघा,
कुणाला काय काय बोलले जात आहे ?
गुणाला आणि अवगुणालाही,
सत्तेच्याच मापाने तोलले जात आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8653
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14ऑगस्ट2024
 

Tuesday, August 13, 2024

दैनिक वात्रटिका l 13ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -74 वा


दैनिक वात्रटिका l 13ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -74 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

गुलाबी छटा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गुलाबी छटा

लोकसभेत घड्याळाचे,
राजकीय हाल झाले.
विधानसभेसाठी घड्याळाचे,
गुलाबी गुलाबी गाल झाले.

त्यांची वाजली तुतारी,
यांचा मात्र बँड वाजला आहे.
विधानसभेच्या आखाडा,
गुलाबी रंगाने सजला आहे.

सगळे गुलाबी असले तरी,
बाजूला भगव्याची छटा आहे !
कमळात अडकलेले भुंगे बघून,
अंगावर गुलाबी काटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8652
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13ऑगस्ट2024
 

Monday, August 12, 2024

दैनिक वात्रटिका l 12ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -73 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 12ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -73 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

सुपारीबहाद्दर बुद्धीवादी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सुपारीबहाद्दर बुद्धीवादी

अंडरवर्ल्डप्रमाणे राजकारणातही,
आता सुपार्‍यावर सुपाऱ्या आहेत.
फक्त इथेच सुपाऱ्या वाजवतात,
ह्या तर निव्वळ फपाऱ्या आहेत.

सुपार्‍या घेणाऱ्यांच्या रांगेत,
इथले काही बुद्धीवादी आहेत.
सुपारीबहाद्दर बुद्धीवादी नाहीत,
ते तर पक्के बुद्धीभेदी आहेत.

जनतेच्या श्रद्धा आणि विश्वासाला,
बुद्धीवाद्यांकडून छेद दिला जातो !
नको त्याचा नको तसा अर्थ लावून,
जनतेचा बुद्धीभेद केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8651
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12ऑगस्ट2024
 

Sunday, August 11, 2024

दैनिक वात्रटिका l 11ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -72 वा


दैनिक वात्रटिका l 11ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -72 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

सुपारीचे प्रत्युत्तर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सुपारीचे प्रत्युत्तर

निषेधाचे राजकारण बघा,
कुठपर्यंत जाऊन टेकले आहे?
त्यांनी सुपार्‍या उधळल्या म्हणून,
यांनी चक्क शेण फेकले आहे.

सुपार्‍याला उत्तर म्हणून,
शेणासोबत बांगड्या आहेत.
समर्थनार्थ केलेल्या सबबीही,
तोकड्या आणि लंगड्या आहेत.

ज्या गावच्या बाभळी आहेत,
अगदी त्याच गावच्या बोरी आहेत !
सेनापतींचे रंगले वाक् युद्ध,
घाव मात्र सैनिकांच्या उरी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8650
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11ऑगस्ट2024
 

Saturday, August 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -71 वा

दैनिक वात्रटिका l 10ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -71 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

सुपारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सुपारी

कुणी उधळल्या सुपारी,
कुणाची सुपारी फुटली आहे.
सुपाऱ्यांचा खेळ बघून,
प्रेक्षकांनी मजा लुटली आहे.

कुणी सुपारी वाजवू लागले,
कुणी सुपारी कातरू लागले.
जे अडकले अडकित्त्यात,
ते मात्र बिथरू लागले.

कुणाची सुपारी कच्ची आहे,
कुणाची सुपारी पक्की आहे !
प्रचारात सुपारी गाजणार,
एवढे मात्र नक्की आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8649
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10ऑगस्ट2024


 

Friday, August 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9 ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -70 वा


दैनिक वात्रटिका l 9 ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -70 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

कुरघोडी आणि राजकारण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कुरघोडी आणि राजकारण

ज्याला त्याला प्रत्येकाला,
फक्त खुर्चीचीच हाव आहे.
म्हणूनच राजकारणाचे,
कुरघोडी हे दुसरे नाव आहे.

कुरघोड्याशिवाय राजकारण नाही,
राजकारणाशिवाय कुरघोडी नाही.
तरीही राजकारण करणाऱ्यांची,
संख्या काही थोडीथिडी नाही.

राजकारण कुठलेही असो,
अगदी सगळीकडे हेच आहे !
आपण ज्याला कुरघोड्या म्हणतो,
त्यांच्या मते हा तर डावपेच आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8648
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9ऑगस्ट2024
 

Thursday, August 8, 2024

दैनिक वात्रटिका l 8 ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -69 वा


दैनिक वात्रटिका l 8 ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -69 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

विनेश फोगट च्या निमित्ताने ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विनेश फोगट च्या निमित्ताने

सेकंदाप्रमाणे ग्रॅमचे महत्त्व सांगताना,
ऑलिंपिकचे उदाहरण दिले जाऊ शकते.
फक्त 100 ग्रॅम वाढीव वजनामुळे,
ऑलिंपिकचे पदकही गेले जाऊ शकते.

आपल्या स्वप्नांचा खेळखंडोबा झाला,
पण यशानेच अपयश धुतले पाहिजे.
पदरात पडलेले अपयशसुद्धा,
आपण खिलाडूवृत्तीने घेतले पाहिजे.

आता तमाम भारतीयांचे दुःख,
कानी कपाळी मारले जाऊ शकते !
आता वेट लॉस वाल्यांकडून,
याच दुःखाची जाहिरात होवू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8647
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8ऑगस्ट2024
 

Wednesday, August 7, 2024

दैनिक वात्रटिका l 7 ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -68 वा


दैनिक वात्रटिका l 7 ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -68 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 #दैनिकवात्रटिका  #सूर्यकांत_डोळसे 
#suryakanti_live  #मराठी_वात्रटिका

मॉडर्न अंधश्रद्धा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मॉडर्न अंधश्रद्धा

ही अंधश्रद्धा काढून टाका,
आपल्या अंधश्रद्धा जीर्ण होत आहेत.
उघडा डोळे बघा नीट,
आपल्या अंधश्रद्धा मॉडर्न होत आहेत.

जेवढे मॉडर्न लोक आहेत,
तेवढ्या मॉडर्न त्यांच्या अंधश्रद्धा आहेत.
सगळ्या मॉडर्न लोकांच्या जोडीला,
तथाकथित सुशिक्षित लोकसुद्धा आहेत.

आपल्या अनिष्ट रूढी परंपरांचे,
मॉडर्न असे प्रगतीकडे पाऊल आहे !
हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे,
आपली अंधार युगाकडे चाहूल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8646
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7ऑगस्ट2024
 

Tuesday, August 6, 2024

दैनिक वात्रटिका l 6 ऑगस्ट2024 वर्ष- चौथेअंक -67 वा


दैनिक वात्रटिका l 6 ऑगस्ट2024 
वर्ष- चौथे
अंक -67 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 
 

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 108 वा

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 108 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1ZJ-teI8ofC940rJZ_a...