आजची वात्रटिका
--------------------
बिनधास्त आणि बेधडक
जस जसा खळखळाट वाढला,
तसे राजकारण उथळ होऊ लागले.
ज्याचे त्याचे राजकारण,
अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले.
अशी एकही गोष्ट उरली नाही,
जिचा राजकारणात मुडदा नाही.
राजकारण लपून-छपून करायची गोष्ट,
आज त्याला कसलाच आडपडदा नाही.
सारे काही बिनधास्त आणि बेधडक,
सांगा कुणाला कुणाची भीती आहे ?
उथळ आणि सवंग राजकारणात,
अगदी नको नको त्याचीही माती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8796
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11जानेवारी 2025
No comments:
Post a Comment