Thursday, January 23, 2025

कॉपी शपथ सांगतो..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

कॉपी शपथ सांगतो..

परीक्षा देणाऱ्या आणि घेणाऱ्यावर,
पुन्हा एकदा नसती आफत आहे.
इच्छा असली आणि नसली तरीही
सक्तीने कॉपीमुक्तीची शपथ आहे.

कितीतरी शपथा घेतल्या गेल्या,
तरीही कॉपीमुक्ती झालेली नाही.
कुणाचीही कॉपी मुक्तीची शपथ,
अजूनही वास्तवात आलेली नाही.

शपथ देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची,
खरोखरच आम्हाला कीव आहे !
प्रत्येक परीक्षेला कॉपी सांगते,
मी अपरिहार्य आणि चिरंजीव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8808
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23जानेवारी 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...